आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय:आता घर होणार स्वस्त; सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात 3 टक्क्यांची कपात, राज्य मंत्रिमंडळ निर्णय पुढील वर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत दोन टक्क्यांची कपात

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. गृहनिर्माण आणि रिअॅल्टी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. हे लक्षात घेता मंत्रिमंडळाने सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

आता अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर १ सप्टेंबर २०२० पासून ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीकरिता ३ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्यानंतर १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीकरिता मुद्रांक शुल्क २ टक्क्यांनी घटवण्यात आले आहे. सध्या राज्याच्या विविध भागांत स्थानिक कर वगळता घर खरेदीच्या प्रक्रियेत आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क ५ टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांना ३%ची भरघोस सूट मिळाल्याने घर खरेदीत वाढ होण्याची आशा आहे.

लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर होईल. येत्या २० सप्टेंबर रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा (एमपीएससी) लेखी परीक्षा होणार होती. कोरोनामुळे आधीही परीक्षेची तारीख बदलण्यात आली होती. मात्र राज्यातील कोरोनाचा कहर कमी होण्याची शक्यता नसल्याने धोका नको म्हणून परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

८ मनपा व ७ न.प.साठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
बृहन्मुंबई मनपा वगळता एमएमआर क्षेत्रातील ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन होईल. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील नवी मुंबई महानगरपालिका (सिडको आणि नैना क्षेत्रासह), ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर, उल्हासनगर अशा ८ महानगरपालिकांचा यात समावेश आहे.

सर्व सार्वजनिक-मालवाहतूक वाहनांना आता वाहन कर माफी
सार्वजनिक आणि मालवाहतूक वाहनांना वाहन कर माफी देण्यात आली आहे. १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत वाहन कर भरण्यापासून १००% करमाफी म्हणजे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक कराच्या ५०% करमाफी मिळेल. ही करमाफी मालवाहतूक वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम वाहने, खासगी वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वाहनांना लागू राहील.

अौरंगाबाद परिसरात घरांच्या मागणीत वाढ होण्याची आशा
औरंगाबाद | शहरात ५% स्टॅम्प ड्यूटी व १% स्थानिक कर आणि नोंदणी फी आकारली जाते. ग्रामीणमध्ये ४% स्टॅम्प ड्यूटी आहे. आता शहरामध्ये ३१ डिसेंबरपर्यंत २% स्टॅम्प ड्यूटी आणि १% स्थानिक कर आणि नोंदणी फी आकारली जाईल. यामुळे घरांची मागणी वाढू शकते.

महसूल ५०% पर्यंत घटला
कोरोनामुळे मुद्रांक शुल्कातून मिळणारा महसूल ५०% ते ६० टक्क्यांपर्यंत घटला असतानाही राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष नयन शहा म्हणाले, या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱ्यांना प्राेत्साहन मिळेल.

अतिरिक्त दुधापासून भुकटी योजना ऑक्टोबरपर्यंत : अतिरिक्त दुधाचे भुकटीत रूपांतर करण्याची योजना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांसाठीही असेल. ही भुकटी ६ लाख ५१ हजार मुलांना प्रतिदिन प्रतिविद्यार्थी १८ ग्रॅम याप्रमाणे ६ लाख ५१ हजार मुलांना आणि प्रतिदिन प्रतिमहिला २५ ग्रॅम याप्रमाणे १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना १ वर्षासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser