आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलेबाजी:राजकीय आरोपांमध्येही आजकाल कोरोनाप्रमाणे म्युटेशन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवाब मलिक-फडणवीस वादावर उद्धव ठाकरेंची मल्लिनाथी

आजकाल राजकीय आरोपांमध्ये कोरोनाप्रमाणे उत्परिवर्तन (म्युटेशन) होत आहे, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवंेद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांवर व्यक्त केली.

दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी सोमवारी (ता.१) पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांनी केलेले आरोप व त्यावर फडणवीस यांचे प्रत्याराेप याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, हल्ली कोण काय आरोप करील आणि प्रकरण कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. आजकाल राजकीय आरोपांमध्ये कोरोनाप्रमाणे उत्परिवर्तन (म्युटेशन) होत आहे.

मंत्रालयात वॉररूम होती. मी विचार केला की, वॉर कुणाशी करायचे? म्हणून मी त्यांचे नाव बदलून संकल्प कक्ष केले. नव्या योजना आखण्यासाठी याचा वापर करायचा होता. पण कोरोनामुळे तिथले अधिकारी दुसरीकडे द्यावे लागले. आता त्याला चालना देत आहोत. तसेच आपण लवकरच मंत्रालयात येऊन कारभार पाहू, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या वापराविषयी (सीएसआर फंड) प्रश्न केला असता ते म्हणाले, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे काम सुरू आहे. आपण ते बंद केलेले नाही. सीएसआर फंड आपल्याकडे किती येतो आणि किती खर्च करतो यावर म्हणाल तर पंतप्रधान आणि मी एकत्रित त्याचा हिशेब देणार आहोत, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी लगावली. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जातो, तर असा कुठलाही शब्द दिला नसल्याचा दावा भाजप नेते करत असतात. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी निशाणा केले. ‘ठरल्याप्रमाणे जर सगळे झाले असते तर मी फोटोग्राफी केली असती अन् तुम्हाला प्रदर्शनाला बोलावले असते,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

राजकीय फटाके फोडायला दिवाळीची गरज नसते : ठाकरे
दिवाळीनंतर फटाके फुटतील, या भाजप नेत्यांच्या दाव्यावर उद्धव म्हणाले, राजकीय फटाके फोडायला दिवाळीची गरज नसते. तुम्ही इथल्या फटाक्यांची काय भाषा करता, पाकिस्तानात फटाके कधी फोडताय हे पण जरा सांगा, अशी विचारणा त्यांनी भाजपला केली.

आॅक्सिजनची मागणी ७०० टनांवर गेल्यास पुन्हा लाॅकडाऊन
कोरोनाची तिसरी लाट येईल किंवा येणारही नाही. नागरिकांनी लसीच्या दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करू नये. सध्या दैनंदिन १५० मेट्रिक टन प्राणवायू लागतो आहे. तो ७०० टनांवर गेला की, पुन्हा लाॅकडाऊन करावे लागेल, असा सावधगिरीचा इशारा ठाकरेंनी दिला.

बातम्या आणखी आहेत...