आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचा भाजपवर निशाणा:सध्या संपूर्ण देशातील केवळ दोन राज्यांमध्ये राज्यपाल आहेत, एक महाराष्ट्रात आणि दुसरे....; संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात बंगाल आणि महाराष्ट्रात विरोधीपक्षाचे सरकार आहे. या दोनच राज्यात राज्यपाल असल्याचे राऊत म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने खटके उडत असल्याचे दिसत आहे. राज्यपालांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलेल्या पत्रव्यवहारानंतर तर राज्यपाल आणि मुख्यमंत्री हा संघर्ष पेटलेला दिसतोय. आता याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे.

खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या नियुक्तीवरुन पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. सध्या देशातील दोनच राज्यांमध्ये राज्यपाल नियुक्त आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्येच राज्यपाल आहेत असे म्हणत राऊतांनी भाजपला कोपरखळी मारली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत हिंदुत्वावावरुन डिवचले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर देत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे ठाकरे म्हटले होते. यावरुन सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. राज्यपाल हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊतांकडून केला जात आहे. यासोबतच राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यघटनेला अनुसरुन राज्य चालते की नाही, हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य असल्याचंही राऊत यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी निशाणा साधला आहे.

देशभरात बंगाल आणि महाराष्ट्रात हे विरोधीपक्षाचे सरकार आहे. या दोनच राज्यात राज्यपाल असल्याचे राऊत म्हणाले. राज्यपाल हे भारत सरकार आणि राष्ट्रपती यांचे पॉलिटकल एंजट असतात, कारण ते राजकीय काम करतात. सध्या महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी सरकार आहेत याच कारणामुळे देशातील या दोनच राज्यांमध्ये राज्यपाल असल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांचे सरकार आहे. येथे जगदीप धनखार हे राज्यपाल आहेत. मात्र येथेही सरकार आणि राज्यपालांमध्ये खटके उडत असतात.

बातम्या आणखी आहेत...