आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई येथे लवकरच केंद्र सरकार भरती करणार आहे. यासाठीची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीचा 28 एप्रील 2023 असणार आहे.
या जागेसाठी होणार भरती
कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी तब्बल 325 पदांची नोकर भरती होणार आहे.
काय आहे पात्रता?
कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी
BE/B Tech/B Sc (अभियांत्रिकी)/5 वर्षाचे इंटिग्रेटेड एम टेक, ज्याला AICTE/UGC द्वारे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी/डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या 6 अभियांत्रिकी विषयांपैकी एकामध्ये किमान 60% एकूण गुण आहेत.
किमान 60% गुण म्हणजे संबंधित विद्यापीठाच्या अध्यादेशांनुसार गुण.
अर्जदारांकडे पात्रता पदवी शिस्तीप्रमाणेच अभियांत्रिकी शाखेत वैध GATE-2023 किंवा GATE-2021 किंवा GATE-2022 गुण असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क किती?
या भरती प्रक्रीयेला अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये शुल्क असून मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा) , दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो
कसा कराल अर्ज?
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.npcilcareers.co.in/ETHQ20230430/candidate/default.aspx या लिंकवर क्लिक करा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.