आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • NSE Former CEO Chitra Ramakrishna Home Income Tax | Income Tax Raid On Mumbai Home Of Former NSE CEO Chitra Ramakrishna; Allegation Of Giving Confidential Information To Himalayan Yogis | Marathi News

मोठी बातमी:NSE च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या मुंबईतील घरावर आयकराचा छापा; हिमालयन योगीला गुप्त माहिती दिल्याचा आरोप

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या मुंबईतील निवासस्थानावर इनकम टॅक्स विभागाने छापा टाकल्याची माहिती मिळत आहे. चित्रा रामकृष्ण यांच्यावर एका आध्यात्मिक गुरूसोबत गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. चित्रा रामकृष्ण या हिमालयातील एका अदृश्य योगीच्या सल्ल्याने निर्णय घेत असल्याची समजते. या गुरूच्या सांगण्यावरून त्यांनी आनंद सुब्रमण्यम यांची एक्सचेंजमध्ये ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून नियुक्ती होती.

एनएसईच्या माजी सीईओ, चित्रा रामकृष्ण यांनी सेबीच्या चौकशीत खुलासा केला होता की, त्या शेअर बाजाराच्या बाबतीत हिमालयातील एका अज्ञात योगीचा सल्ला घेत असत. अशी संवेदनशील माहिती दुसऱ्याला दिल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.

आनंद सुब्रमण्यम यांची मुख्य धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तसेच एमडीचे सल्लागार म्हणून पुनर्नियुक्ती चित्रा रामकृष्ण यांच्यामुळे झाली होती. त्यामुळे त्या अडचणीत सापडल्या असल्याचे बोलले जात आहे. सेबीच्या म्हणण्याप्रमाणे, एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 या कालावधीत एनएसईचे कामकाज रामकृष्ण यांनी सांभाळले होते.

(बातमी अपडेट होत राहील)

बातम्या आणखी आहेत...