आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य:मुंब्रा पोलिसांकडून नुपूर शर्मा यांना समन्स; 22 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंब्रा पोलिसांकडून भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना समन्स बजावण्यात आले आहे. 22 जून रोजी चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जागतिक पातळीवर पडसाद उमटल्यानंतर शर्मा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंब्रा पोलिसांनी शर्मा यांना बजावलेले समन्स हे चौकशीसाठी असून, 22 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावर मुंब्रा पोलिस चौकशी करणार आहेत. पोलिसांना चौकशीकरुन एक रिपोर्ट राज्य सरकारला सादर करायचा आहे. त्यानंतर पुढची कारवाई होण्याची शक्यता आहे. नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंब्रासह आणखी दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यासंदर्भात पोलिस शर्मा यांची चौकशी करणार आहे.

शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का? तसेच पैगंबराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो का? याविषयी पोलिस चौकशी करणार आहेत.

जगभरात पडसाद

आखाती देशांनी भाजप नेत्या नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर आखाती देशांनी तीव्र हरकत नोंदवली आहे. कतार, कुवैत व इराणने या विधानाप्रकरणी भारतीय राजदुतांना नोटीस बजावली आहे. विशेषतः कतार व कुवैतने तर भारत सरकारकडे या प्रकरणी माफी मागण्याचीही मागणी केली आहे. तर सौदीने या प्रकरणी केवळ आक्षेप नोंदवला आहे. सौदी अरेबिया, कुवैत, बहारीन व अन्य अरब राष्ट्रांनी आपल्या सुपर स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या भारतीय उत्पादनांवर बंदीही घातली आहे.

बातम्या आणखी आहेत...