आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OBC आरक्षणावरून राजकारण:छगन भुजबळ म्हणाले - OBC आरक्षण ही आता केंद्राची जबाबदारी, राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जावे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षण वाचवा असे आम्ही आवाहन करत असून, आम्हाला दोष देण्याऐवजी दिल्लीत जाऊन बसा आणि केंद्र सरकारला सांगा की काही तरी मार्ग काढा, महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी डाव सूरू असून, हा डाव संघाचा तर नाही ना? असे म्हणत राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणवरुन टीकास्त्र केले. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

ओबीसी आरक्षण ही आता केंद्राची जबाबदारी असून, कारण युपीए सरकारने 2010-11 मध्ये जे मान्य केले होते, प्रमाणे ओबीसी डाटा जमा झाला. 2016 ला हा डाटा बीजेपी सरकारच्या हातात गेले, तेव्हापासून त्यांनी कुठल्या ना कुठल्या कारणांनी तो देण्यास नकार दिला. कधी सांगितले त्यात त्रुटी आहेत, तर कधी सांगितले संसदेच्या कमिटीला त्या त्रुटी दूर झाल्या आहेत. तोच डाटा नंतर उज्वला गॅस योजनेसाठी वापरण्यात आला. नंतर प्रधानमंत्री आवास योजनेसाठीही वापरला. राज्याने केंद्राने इम्पिरिकल डाटा मागितला होता, मात्र त्यांनी तो दिला नाही, असे म्हणत भुजबळांनी केंद्र सरकारवर खापर फोडले.

पुढे भुजबळ म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कुठलेही राज्य हे काम करू शकलेले नाही, त्यामुळे केंद्र सरकार जर थोड्याशा नरमाईच्या भुमिकेच गेले असते तर आणखीण ही निवडणूक झाल्यानंतर आपल्याला आरक्षण मिळाले असते. देशातील राज्यांना काही वर्ष मिळाली असती. पंरतु राज्यातील भाजपच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात गेले, त्याचा परिणाम आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात सगळ्या देशाचे ओबीसीचे लोकं पडले, त्यात भाजपचे राज्य देखील आहेत, असे भुजबळ म्हणाले.

केंद्र सरकारने आरक्षण वाचवायला हवे

युपीए सरकारच्या काळात इम्पिरिकल डाटा गोळा केलेला होता. त्यावर 5 ते साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तो डाटा भाजपने दाबून ठेवला आहे. भारत सरकारने तात्काळ त्याचा अभ्यास करत त्याचे अध्यादेश काढून या देशातील ओबीसींचे आरक्षण वाचवले पाहिजे. राज्यातील ओबीसींना आरक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे, मात्र आज राज्याचा नव्हे तर देशातील ओबीसींचा प्रश्न आहे, असे भुजबळ म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...