आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्‍टमंडळाने घेतली राज्‍यपालांची भेट:ओबीसी विधेयकावर राज्‍यपालांची स्‍वाक्षरी; ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याची रणनिती

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवशेनानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर शिष्टमंडळाने ही भेट घेतली असून, ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर अखेर राज्यपालांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर जाणार आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण लागू होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात विधेयक मांडले होते. यामुळे निवडणूक प्रक्रियेचे अधिकार राज्य सरकारकडे येणार होते. राज्य सरकारकडून मांडण्यात आलेले हे विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले होते. मात्र, राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतरच त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. आज राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. आता लवकरच या संदर्भात कायदा तयार होणार असून, राज्‍यसरकार प्रभाग रचना, वॉर्ड रचना, मतदार यादी बनवणे आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकते.

नव्‍याने प्रभाग रचना करणार - एकनाथ शिंदे

वार्ड रचना करण्‍याचे अधिकार सरकारकडे आले आहे. निवडणुकांच्‍या तारखा निवडणूक आयोगच ठरवणार आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या अधिकारांवर कोणतीही गदा आलेली नाही. असे सांगताना राज्‍यपालांना आम्‍ही विनंती केली आणि त्‍यांनी विधेयकावर स्‍वाक्षरी केली, अशी प्रतिक्रिया राज्‍याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. लवकरच 12 आमदारांच्‍या मुद्दयावर देखील राज्‍यपाल लवकरच निर्णय देतील असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...