आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारी भुजबळांकडे:ओबीसी आरक्षण लढाईचे नेतृत्व भुजबळ यांच्याकडे; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शरद पवारांनी घेतली बैठक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याची जबाबदारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टाकण्यात आली असून तसा निर्णय बुधवारी (५ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाला. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत ही पक्षाची भूमिका यापुढे कायम राहील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाचे मंत्री व नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली. मलिक म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता आहे. त्यामुळेच पक्षाने नियोजित शिबिरे व कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होईल असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये, असा निर्णय झाल्याचे मलिक यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. संपर्कमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती कशी यावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक नेत्याला एक जिल्हा देण्यात आला आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...