आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोगाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र:महापालिका निवडणुकांवर राज्य सरकार अभ्यास करून पाऊल उचलणार; न्यायालयाच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करावा, असे आदेश दिले आहेत. अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, सुप्रीम कोर्टाने आज सांगितले की, रखडलेल्या निवडणुका 2 आठवड्यात जाहीर करा. यावर राज्य सरकार अभ्यास करून पुढचे पाऊल टाकणार आहे. असे म्हणत निवडणुका 2 आठवड्यात जाहीर होणार का या प्रश्नाला छगन भुजबळ यांनी बगल दिली आहे. यावर बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाने पावसाळ्यात निवडणुका घेता येणार नाही असे प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल केल्याचेही सांगितले.

काय म्हणाले छगन भुजबळ?
सुप्रीम कोर्टाने आज सांगितले की रखडलेल्या निवडणुका 2 आठवड्यात जाहीर करा. या वर राज्य सरकार अभ्यास करून पुढचे पाऊल टाकणार आहे. असे म्हणत निवडणुका 2 आठवड्यात जाहीर होणार का या प्रश्नाला छगन भुजबळ यांनी बगल दिली आहे.

यावर बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाने पावसाळ्यात निवडणुका घेता येणार नाही असे प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आजची जी आपली केस होती, ती राज्याने जो कायदा केला त्याला काही लोकांनी चॅलेज केले होते. आपल्या सारखा कायदा मध्यप्रदेश सरकारने केला होता. तोही आज त्यांच्यासमोर होता. यावर त्यांनी भाष्य केले आहे. तर निवडणुकांच्या मुद्दांवर बोलण्याचे त्यांनी टाळले आहे.

राज्य सरकारने इम्पेरिकल डाटा उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सुरू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र निवडणुका 2 आठवड्यात जाहीर करा असे कोर्टाने सांगितले आहे. हा राज्य सरकारला झटका म्हणता येऊ शकतो. जर निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय झाल्यास, महाविकास आघाडी सरकार विरोधात ओबीसी समाजाचा रोष निर्माण होऊ शकतो अशी भीती सरकारला आहे.

त्यामुळे या सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर करण्यात आला होता. त्याला सर्वपक्षीय नेत्यांनी मंजुरी देखील दिली होती. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ देणार नाही असे सांगत विरोधी पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यास विरोध केला होता. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...