आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साकीनाका'त त्या दिवशी नेमके काय घडले?:सीसीटीव्हीत चेहरा दिसत नव्हता, तरीही हालचालीवरून पकडला गेला नराधम मोहन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कचरावेचक आरोपीने केला होता रॉडने गुप्तांगावर हल्ला

मुंबईचा साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहन चौहानचा सीटीव्हीमध्ये चेहरा दिसत नव्हता, पण तरीही केवळ हालचालीवरून तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. खैरानी रोडवर एका टेम्पोमध्ये आरोपी मोहन चौहान (45 वर्षे) ने 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. एवढ्यावर न थांबता त्याने महिलेला बेदम मारहाण करत तिच्या गुप्तांगामध्ये लोखंडी सळई घुसवली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दिल्लीत निर्भयाकांड घडले त्याचप्रमाणे आरोपी मोहन चौहान (45) याने पीडितेसोबत असेच गैरकृत्य केले होते.

30 तास उपचार

9 सप्टेंबरला 2021 ला आढळली होती बेशुद्धावस्थेत आढळली होती. पीडित महिलेवर बलात्कार झाल्यानंतर ती 9 सप्टेंबर 2021 ला साकीनाकाच्या खैरानी रोड भागात बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. गंभीर प्रकृती असल्याने तिला व्हेंटीलेटरवरही ठेवण्यात आले होते, पण उपचारानंतरही पीडितेचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेजवरून बेड्या

आरोपी मोहन चौहान
आरोपी मोहन चौहान

मुंबईत बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर रॉडने जबर वार केले होते. पीडित महिलेवर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी शोधत आरोपीपर्यंत पोहचून त्याला अटक केली होती.

अस्पष्ट फुटेज असूनही...

घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेचे हे अंधुक चित्र कैद झाले होते, त्या आधारे आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.
घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेचे हे अंधुक चित्र कैद झाले होते, त्या आधारे आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.

सीसीटीव्ही फुटेजनुसार घटनेच्या दिवशी दुपारी 2.30 ते 3 च्या दरम्यान हा प्रकार घडला होता. यात आरोपीने बलात्कारानंतर महिलेला रॉडने गंभीर जखमी केल्याचे दिसते. त्यानंतर त्याला आक्षेपार्ह अवस्थेत पिकअप व्हॅनमध्ये टाकून तो पळून जातानाची बाबही सीसीटीव्हीत दिसत होती, पण रात्री अंधार असल्याने फुटेज फारसे स्पष्ट नव्हते तरीही आरोपीच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या. या फुटेजच्या आधारे आरोपी मोहन चौहान (45) याला अटक करण्यात आली होती.

कचरा वेचण्याचे काम करत होता...

गुन्ह्यावेळी आरोपीने याच टेम्पोचा वापर केला होता.
गुन्ह्यावेळी आरोपीने याच टेम्पोचा वापर केला होता.

आरोपी मोहन चौहान (45) हा जौनपूरचा रहिवासी आहे. तो मुंबईतील साकीनाका परिसरात भाऊ आणि बहिणीसोबत राहत होता. कधी ड्रायव्हर म्हणून तर कधी कचरा वेचण्याचे तो काम करीत होता.

बलात्कारानंतर हत्याच करायची होती

रस्त्यावरुन जाणाऱ्या पीडितेवर आरोपी मोहनची वक्रदृष्टी होती. ती रस्त्याच्या कडेला फिरताना त्याने पाहिले होते. आरोपी मोहनला​​​​​​ बलात्कारानंतर पीडितेची हत्याच करायची होती, म्हणून त्याने रॉडने प्रायव्हेट पार्टवर वार केले. पंधरा मिनिटांनंतर तिथून जात असलेल्या कोणीतरी महिलेला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पाहिले आणि साकीनाका पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली होती.

दोन मुलींसह राहात होती मुंबईत

पोलिसांच्या तपासात हेही समोर आले की, पीडितेला 13 आणि 16 वर्षांच्या दोन मुली असून ती महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खाजगी नोकरी करत होती. आरोपींबद्दल माहिती अशी की, त्याला अंमली पदार्थांचे व्यसन असून तो गुन्ह्याच्या वेळीही दारूच्या नशेत होता.

मुंबईतील याच राजावाडी रुग्णालयात पीडितेने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी अनेकवेळा शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
मुंबईतील याच राजावाडी रुग्णालयात पीडितेने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी अनेकवेळा शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला होता.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला

मुंबईचे पोलिस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांनी घटनेचे गांभिर्य पाहून या प्रकरणात त्यांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवून पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले होते.

महिला आयोगाने घेतली होती दखल

  • राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण होणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे अत्यंत गरजेचे असल्याचेही महिला आयोगाने तेव्हा म्हटले.
  • या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या 376, 307 आणि 325 या कलमान्वये आरोपींवर कारवाई करता येणे शक्य असल्याचेही महिला आयोगाने निदर्शनास आणून दिले होते.
  • पीडितेला एवढ्या निर्घृण अत्याचाराचा सामना करावा लागला. हे अत्याचार पाहता या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले असे महिला आयोगाने म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...