आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:कर्मचारी पॉझिटिव्ह, मंत्रालयातील छगन भुजबळ, नितीन राऊत आणि उदय सामंत यांची कार्यालये तात्पुरती बंद

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने छगन भुजबळ यांनी घरात क्वारंटाईन होण्याचा निर्णय

पावसाळी अधिवेशनानंतर मंत्री आणि त्यांच्याशी संबंधित कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची बाब समोर येत आहे. मंत्रालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील 3 मंत्र्यांचे कार्यालये तात्पुरती बंद करण्यात आले आहेत.

पावसाळी अधिवेशनानंतर सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम पॉझिटिव्ह आले. अधिवेशन सुरू होण्याआधी त्याआधी अध्यक्ष नाना पटोले देखील कोरोनाबाधित झाले होते. अधिवेशनाच्या वेळी देवेंद्र भुयार, राहुल नार्वेकर, गोपीचंद पडळकर, प्रवीण पोटे या आमदारांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळले तर उदय सामंत यांच्याही कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत.

छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आले. तर ऊर्जामंत्री यांच्या कार्यालयातील १० अधिकारी, कर्मचारी घरी काम करणारा कुक पॉझिटिव्ह आले. कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने छगन भुजबळ यांनी घरात क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. नितीन राऊत बैठकांना हजेरी लावत आहेत, असले तरी मंत्र्यांच्या स्टाफला कोरोना बाधा झाल्यामुळे त्यांचे कार्यालय तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत.