आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओएलएक्स ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मद्वारे लोकांची फसवणूक:मुंबई पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; चार आरोपींना केली अटक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने 'ओएलएक्स' या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. राजस्थानमधून तीन आणि यूपीमधून एका आरोपीला अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

मुंबई पोलिसांचे पोलिस उपायुक्त (सायबर गुन्हे) डॉ. बालसिंग राजपूत यांनी सांगितले की, सायबर गुन्हे करणाऱ्या या टोळीतील आरोपींनी कामाची विभागणी केली होती. त्यांनी एकूण चार टीम तयार केले होते. आंतरराज्यीय या टोळीची पहिली टीम 'ओएलएक्स'वर कोणतीही वस्तू विकण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीची माहिती गोळा करायची. या टोळीतील इतर सदस्य बोगस ग्राहक असल्याचे भासवून वस्तू खरेदी करण्यासाठी संपर्क साधायचे. फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या खात्यातून हस्तांतरित केलेली रक्कम जयपूरसारख्या शहरातील कोणत्याही एटीएम केंद्रातून काढणे हे या टोळीच्या तिसऱ्या पथकाचे काम होते. चौथ्या गटाचे काम बनावट कागदपत्रांच्या आधारे सायबर क्राइममध्ये वापरलेले मोबाईल फोन आणि सिमकार्ड उपलब्ध करून देण्याचे होते.

या टोळीने केले 269 सायबर गुन्हे

मुंबईच्या सायबर शाखेने ज्या चौघांना अटक केली आहे. त्याने आतापर्यंत एकूण 269 गुन्हे केले आहेत. त्यापैकी 14 प्रकरणे महाराष्ट्रातील आणि काही तेलंगणातील आहेत. सावसुख राजदार ऊर्फ समशु (भरतपूर, राजस्थान), तुलसीराम रोडुलाल मिणा (जयपूर, राजस्थान), अजित पोसवाल (जयपूर, राजस्थान) आणि इर्शाद सरदार (मथुरा, यूपी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून 2 लाख रुपये रोख, 9 मोबाईल फोन, 32 वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, एस बँकेचे चेकबुक आणि चार वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्ड जप्त करण्यात आल्याचे डॉ. बालसिंग राजपूत यांनी सांगितले. त्यांच्याकडून मुंबई पोलिसांनी एकूण 835 मोबाईल क्रमांक पण जप्त केले आहेत. त्यांच्याकडून मुंबई पोलिसांना एकूण 835 मोबाईल क्रमांक आणि 38 आयएमईआय क्रमांक मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...