आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Omicron Coronavirus Variant Outbreak India LIVE Updates | Mumbai Delhi Bhopal Indore Kerala Rajasthan Haryana, Reported Cases And Deaths By State Wise

ओमायक्रॉनचा धोका:महाराष्ट्रात 2 तर गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 1 एक नवीन प्रकरण आले समोर, देशात एकूण 41 प्रकरणे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन नवीन रुग्ण सोमवारी आढळून आले आहेत. पुणे आणि लातूरमध्ये हे नवीन दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 20 झाली आहे. अशाप्रकारे ओमायक्रॉन प्रकाराची देशातील निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातच आहेत. त्याच वेळी, गुजरातमधील सुरतमध्ये 1 ओमायक्रॉन प्रकरणाची पुष्टी झाली आहे. बाधित नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून परतले असल्याची माहिती आहे. यासह, देशभरातील ओमायक्रॉन प्रकाराची एकूण प्रकरणे आता 41 वर पोहोचली आहेत.

पुण्यात एक 39 वर्षीय महिला संक्रमित आढळली आहे. तर लातूरात एका 33 वर्षीय पुरुषामध्ये हा व्हेरिएंट आढळला आहे. दोघांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. दोघेही सध्या सरकारी आयसोलेशन वार्डमध्ये दाखल आहेत. हे दोघे काही दिवसांपूर्वी दुबईतून आले आहेत आणि यांच्या संपर्कात येणाऱ्या 3 लोकांची देखील टेस्टिंग करण्यात आली आहे. तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

केरळमधील कोचीत आढळला होता पहिला रुग्ण

यापूर्वी रविवारी 5 राज्यांमध्ये 5 नवीन रुग्ण आढळले होते. केरळमधील कोची येथे ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, संक्रमित व्यक्ती 6 डिसेंबर रोजी यूकेहून कोचीला परतली होती. 8 डिसेंबर रोजी झालेल्या कोविड चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला होता. त्याचवेळी त्यांच्या पत्नी आणि आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्वांना आयसोलेशन वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.

राज्यातील नागपुरात रविवारी ओमायक्रॉनचे पहिले आणि कर्नाटकात तिसरे प्रकरण समोर आले होते. चंदीगढ आणि आंध्र प्रदेशात देखील ओमिक्रॉनच्या नवीन संक्रमितांची ओळख झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...