आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण:अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढणार?

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या असा सामना गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या पुन्हा 'अॅक्शन मोड'मध्ये आल्याचे पाहायला मिळत असून त्यांनी नवं ट्विट केले आहे. अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरवठा सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये रिसॉर्टवर हातोड पडणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, अनिल परब रिसॉर्ट...पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहोत... दोन चार दिवसांत रिसॉर्ट पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या अनेक दिवासांपासून याच रिसॉर्टवरून अनिल परब यांच्यावर अनेक आरोप भाजपकडूनही केले जात आहेत. साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणाची ईडीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली होती. तसेच ईडीकडून सर्च ऑपरेशनमध्ये अनेक कागदपत्रं ईडीने ताब्यात घेतली होती. तेव्हा शिवसेनेने ही राजकीय सूडाने केलेली कारवाई असल्याचे म्हटले होते.

रिसॉर्टच्या व्यवहारात गडबड
वर्ष 2017 मध्ये परब यांनी दापोलीत 1 कोटी रुपयांमध्ये भूखंड खरेदी केला. 2019 मध्ये त्याची नोंदणी केली. सन 2020 मध्ये मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना हा भूखंड 1 कोटी 10 लाखांत विकला. मात्र सन 2017 ते 2020 या तीन वर्षांच्या कालावधीत तिथे रिसॉर्ट उभे राहिले. यासाठी 6 कोटी रुपये खर्च केले. हा पैसा परब यांचा असल्याचा ईडीला संशय आहे.

आरोपांचे खंडन
अनिल परब यांनी सोमय्या यांच्या आरोपांचे यापूर्वीच खंडन केले आहे. इतकेच नव्हे तर 'दापोली रिसॉर्टशी माझा काहीच संबंध नसताना सोमय्या यांनी निव्वळ आपला राजकीय हेतू साधण्यासाठी व प्रसिद्धीसाठी माझी नाहक बदनामी चालवली आहे, असे अनिल परब म्हणाले होते.

यासंदर्भात वाचा - दिव्य मराठी इंडेप्थ:शिवसेनेच्या संकटमोचकावर EDचा फास; जाणून घ्या, अनिल परब कसे बनले ठाकरेंच्या गळ्यातील ताईत!

बातम्या आणखी आहेत...