आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचा आशावाद:आज लोकशाहीचा विजय झाला; सुप्रीम कोर्टाचा निकाल देशाचे भवितव्य ठरवणारा असेल

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला. आमचा न्यायदेवर सार्थ विश्वास आहे. आता दसरा मेळाव्याला वाजत गाजत, आनंदात आणि गूलाल उधळत या. बाळासाहेबांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. शिस्तीला गालबोट लागता कामा नये. आजचा दिवस लोकशाहीचा विजय आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल देशाचा भविष्य ठरवणारा असेल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सर्वांचे मेळाव्याकडे लक्ष

ठाकरे म्हणाले, इतर लोक काय करतील याची मला कल्पना नाही. पण दसरा मेळावा आपली परंपरा आहे. आजच्या निकालासोबतच दसरा मेळाव्याकडे देशासह जगातील आपल्या बांधवांचे लक्ष लागले आहे म्हणून उत्साहात येतानाच शिस्तीत या.

आता चांगली सुरुवात झाली

ठाकरे म्हणाले, शुभ बोल रे नाऱ्या असे आपण म्हणतो. आता चांगली सुरुवात झाली. विजयादशमीला शिवसेनेचा नारा दिला गेला. कोरोना काळ सोडला तर परंपरा कायमच आहे. आजोबा आणि वडील बाळासाहेब ठाकरेंनी तेथे भाषण दिले.

निकाल काय लागेल माहित नाही

ठाकरे म्हणाले, आजचा दिवस लोकशाहीचा विजय आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल देशाचा भविष्य ठरवणारा असेल. शिवसेनेचा देशातील लोकशाही किती काळ आणि कशी राहील याकडे सर्व जगाचे लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात काय होईल हे मी शिंदे गटासारखे बोलणार नाही. लोकशाहीचे भवितव्य मी सांगेल परंतू सुप्रीम कोर्टात निकाल काय लागेल हे नाही सांगता येणार.

शिवसेनेचा भगवा फडकावयचाय

ठाकरे म्हणाले, उत्साह अमाप आहे. एकजूट सुद्धा तशीच ठेवा, पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावयचा, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, अशी जोरदार घोषणाबाजी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.

निवडणुका जवळ आहेत. पालिका निवडणुक जिंकायची आहे. त्यावर शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे. त्यामुळे गटतट पाडू नका, रुसवे-फुगवे नको. उमेदवारी फार मोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना केले.

यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार? यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत संघर्ष सुरू होता. शिवसेना आणि शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याची आज सुनावणी पार पडली आहे. शिवसेनेकडून वकील एसपी चिनॉय आणि मुंबई महापालिकेकडून वकील मिलिंद साठे यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाच्या वकिलानेही यावेळी जोरदार युक्तिवाद केला. तब्बल चार तास हा युक्तिवाद चालला. मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळत शिवसेनेला अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला 30 ऑक्टोबर 1966 रोजी. तेव्हापासून ते आतापर्यंत काही अपवाद वगळले तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे. दसरा मेळाव्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या खास शैलीतील भाषणाकडे देशातील राजकीय क्षेत्रासह माध्यमांचे खास लक्ष असायचे. मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याची शिवसैनिकांना उत्सुकता राहायची. दसरा मेळाव्यातील भाषणाचे पडसाद देशाच्या राजकारणात दिसायचे. त्यामुळेच हा मेळावा कायम चर्चेचा विषय राहिला आहे.

स्थापनेपासून ते मृत्यूपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाषण केले. 2012 मध्ये मृत्यूपूर्वीच्या दसरा मेळाव्याला संबोधित करताना बाळासाहेब ठाकरेंनी केलेले 'माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या' हे आवाहन आजही शिवसैनिकांच्या स्मरणात आहे.

बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. 2013 मध्ये उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम दसरा मेळाव्याला संबोधित केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे हेच दसरा मेळाव्याला संबोधित करत आहेत. कोरोनाच्या कालखंडातील अपवाद वगळता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच झाला आहे. आता शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर या मेळाव्यात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...