आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्यांच्या हल्ल्याचा फडणवीसांकडून निषेध:महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका, किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आज पुण्यात महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. या दरम्यान सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापतही झाल्याचे समोर आले आहे.

या घटनेवर आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध! असे देवेंद्र फडणवीस ट्वीटमध्ये म्हटले आहेत.

पुणे महापालिका नेमके काय घडले?
पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर, महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळ्याचे एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...