आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचा वाढदिवस:मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसैनिकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अर्पण केला 61 किलोग्रामचा मोदक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना नेत्यांनी दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस 27 जुलै रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शिवसेनेचे नेत्या आणि उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 61 किलो वजनाचे मोदक अर्पण केले. यावेळी महाआरती देखील आयोजित करण्यात आली होती.

या महा आरतीमध्ये माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, पुणे शहर संपर्क प्रमुखा बाळ कदम, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार व अन्य नगरसेवक उपस्थित होते.

शिवसेना नेत्यांनी दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वयाची 61 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आम्ही बाप्पाच्या चरणी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. यासह, देवाचे आभार मानले. ' नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, 'त्यांनी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. संपूर्ण जगाने कोरोना रोगापासून मुक्त व्हावे अशी आम्ही बाप्पाला प्रार्थना केली. तसेच मुसळधार पावसामुळे जीवितहानी झाली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. '

नीलम गोऱ्हेंनी पुढे म्हटले, 'सर्व पूरग्रस्तांचे पुनर्वसन केले गेले पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आमच्या सरकारला या नैसर्गिक संकटापासून सूटका मिळवण्यासाठी अधिक बळ मिळावी अशी प्रार्थना केली आहे.'

बातम्या आणखी आहेत...