आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:आमदार निधीत दहा वर्षांनी एक कोटीची घसघशीत वाढ, बांधकाम साहित्य महागल्याने निधीत केली वाढ

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. यापुढे स्थानिक विकास निधीअंतर्गत प्रतिवर्षी ३ कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी सन २०११-१२ पासून प्रतिवर्षी प्रत्येक आमदारास २ कोटी विकास निधी प्राप्त होत होता.

विधान परिषदेचे ७८ आणि विधानसभेचे २८८ आमदार राज्य विधिमंडळात आहेत. अलीकडच्या काळात बांधकाम साहित्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विकास निधीत वाढ करण्याची मागणी आमदार सातत्याने करत होते. वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात आमदार निधीत एक कोटी वाढ करण्याची घोषणा झाली होती. मात्र तो वाढीव निधी प्राप्त झाला नव्हता. मंगळवारी नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. वाढीव निधीचा शासनाच्या तिजोरीवर ३६६ कोटींचा बोजा पडणार आहे.

स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत लहान कामे केली जातात. विकास निधीत एक कोटीची घसघशीत वाढ केल्याने आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अधिक संख्येने कामे करणे यापुढे शक्य होणार आहे. तसेच जुन्या योजनांच्या दुरुस्तीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

देखभालीसाठी ३०%निधी
विशेष म्हणजे या निधीतील ३० टक्के निधी पूर्वी झालेल्या विकास कामांच्या देखभालीवर खर्च करण्यात येणार आहे. तसेच त्यातील १० टक्के निधी राज्य शासनाच्या इतर योजनेतून उभ्या राहिलेल्या वास्तुंच्या देखभालीवर तातडीची बाब म्हणून खर्च करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...