आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कराची बेकरीच्या नावावरून राजकारण:कराची बेकरीच्या नाव बदलण्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले - एक दिवस कराची भारतात असेल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कराची बेकरीचे नाव बदलण्याची नितीन नांदगावकर यांनी मागणी केली होती

मुंबईतील कराची स्वीट्स बेकरीच्या नावावरून राज्यात राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी या बेकरीचे नाव बदलण्याची मागणी केली होती. आता या वादात भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेत प्रतिक्रिया दिली आहे. कराची एक दिवस भारताचा भाग असेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्र्यांचे हे विधान चर्चेचा विषय बनले आहे.

“आमचा ‘अखंड भारत’वर विश्वास आहे. कराची एक दिवस भारताचा भाग असेल. आम्हाला विश्वास आहे” असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान कराची पाकिस्तानातील शहर आहे. यामुळे या शहराच्या नावाने भारतात दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होतो. असे नांदगावकर यांनी आपल्या मागणीवर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

दुसरीकडे या प्रकरणावर संजय राऊत म्हणाले की, “मुंबईत गेल्या 60 वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची स्वीट्स आहे. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. त्यामुळे आता त्यांचे नाव बदलण्यास सांगण्यात काहीच तथ्य नाही. तसेच नितीन नांदगावकरांची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.” असे राऊत यांनी स्पष्ट केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser