आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे मुले होत आहेत अनाथ:राज्यात 14 हजार मुलांच्या एका पालकाचा मृत्यू, 459 मुले झाले अनाथ, 12,623 मुलांच्या वडीलांचे तर 1,650 मुलांच्या आईचा झाला मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: विनोद यादव
  • कॉपी लिंक
  • नागपुरमध्ये सर्वात जास्त 46 मुले अनाथ झाले

कोरोना महामारीमुळे जगभरात अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाने अनेक मुलांना अनाथ केले आहे. तर राज्यातील 14 हजार 273 मुलांचे आई किंवा वडील दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे 469 मुलांनी आपले आई-वडील दोन्ही गमावले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेंमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, संभाव्य तिसऱ्या लाटेत आणखी या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही माहिती राज्याच्या महिला एवं बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी दिली आहे.

कोकण विभागात 2,711 मुलांचे वडील तर 410 मुलांच्या आईचे निधन झाले आहे. यावितिरिक्त पुणे विभागात 3,054 मुलांचे वडील तर 397 मुलांच्या आईचा मृत्यू झाला आहे. नाशिक विभागात 1,703 मुलांच्या वडीलांचे तर 191 मुलांच्या आईचे निधन झाले आहे. औरंगाबाद विभागात 1,579 मुलांच्या वडीलांचे तर 199 मुलांच्या आईचे निधन झाले आहे. नागपुर विभागात 2,619 मुलांच्या वडीलांचे तर 293 मुलांच्या आईचा मृत्यू झाला आहे. तर अमरावती विभागात 957 मुलांच्या वडीलांचे तर 160 मुलांच्या आईचे निधन झाले आहे.

नागपुरमध्ये सर्वात जास्त 46 मुले अनाथ झाले
राज्यात सर्वात जास्त अनाथ मुलांचा आकडा नागपूर शहरात आढळले आहे. महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी यासंदर्भांत माहिती दिली आहे. मुंबईत 22, ठाणे 37, पुणे 37, जळगाव 19, औरंगाबाद 16, बीड 16, अमरावती 10 आणि अहमदनगरमध्ये 18 मुले अनाथ झाले आहे. याप्रकारे संपूर्ण राज्यात 469 मुले अनाथ झाले असल्याचे यशोमती ठाकुर यांनी सांगितले आहे. राज्य सरकार अनाथ मुलांच्या नावाने 5 लाख रुपये डिपॉझिट करत आहे. सरकारने आतापर्यंत 10 कोटीपेक्षा जास्त रुपये जमा केले असल्याचे त्या म्हणाल्या.

राज्यात दररोज आढळत आहेत 8 ते 9 हजार रुग्ण
महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होताना दिसत आहे. परंतु, राज्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांचा आकडा दररोज 8 ते 9 हजारांपेक्षा खाली येत नाहीये. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...