आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभादेवी राडा प्रकरणी अंबादास दानवेंचा दावा:म्हणाले - एकदा नाही तर, दोनदा फायरिंग केल्याचा व्हिडिओ समोर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ताधारी आमदारांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे प्रकार घडत असल्याचा आरोप विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी केला आहे. दोनदा फायरिंग केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे असा दावाही अंबादास दानवेंनी केला आहे.

अंबादास दानवे म्हणाले?

अंबादास दानवे म्हणाले की, जर आमची चुकी असेल तर आमच्यावर कारवाई करा. मात्र दोन्हीकडून चुकी झालेली असताना केवळ आमच्या लोकांना मध्यरात्री अटक केली जाते, आची तक्रार दाखल करुन घेतली जात नाही असा अरोप अंबादास दानवेंनी केला आहे. हा सर्व सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर शिवसैनिकांवर जर दादागिरी केली तर शिवसैनिक ती सहन करु शकत नाही, असे म्हणताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे असते. मात्र, त्यांच्याकडून तसे होत नाही उलट कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सत्ताधारी आमदार वागतात असा आरोप अंबादास दानवेंनी केला आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, आमदार संतोष बांगर, आमदार प्रकाश सुर्वे, संजय गायकवाड असो की मग नितेश राणे यानंतर सदा सरवणकर यांचे अशी दादागिरी शिवसैनिक सहन करुच शकत नाही असा इशाराही अंबादास दानवेंनी दिला आहे. आता एक व्हिडिआ समोर येत आहे, त्यात एकदा नाही तर दोनदा फायरिंग झाल्याचे समोर आले आहे. ज्याचे रिव्हालवर असेल ते जप्त केले जाईल आणि त्याची सर्व काडतूसे असतात यांचा रेकॉर्ड तपासणार असेही अंबादास दानवेंनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...