आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीसांची मागणी:कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवावी, उदयनराजे भोसलेंनंतर देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे मागणी, पियुष गोयल यांना पाठवले पत्र

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उदयनराजे भोसले यांनी कांदा निर्यातबंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी असल्याचे म्हणत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवले होते

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी घोषित केली. यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यावरुनच भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कांदा निर्यातबंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी असल्याचे म्हणत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवले होते. त्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही गोयल यांना पत्र पाठवले आहे.

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतकरी या निर्णयाच्या विरोधात आहे. यावरुनच आता केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावी अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी पाठवले पत्र
देवेंद्र फडणवीसांनी पियुष गोयल यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, 'मी यापूर्वीही याविषयावर आपल्यासोबत संवाद साधला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी. महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला भावही मिळतो. निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकरी हताश, निराश झाले आहे. मी आशा करतो की तुम्ही लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्याल' असे लिहित फडणवीसांनी केंद्र सरकारला कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची विनंती केली आहे.