आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन परीक्षा शुल्क:ऑनलाइन परीक्षा शुल्क : टीसीएसला 675, आयबीपीएसला द्यावे लागतील 475 रुपये

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरभरती करताना ती पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने नामांकित टीसीएस-आयओएन आणि आयबीपीएस या कंपन्यांना नियुक्त केले आहे. सोमवारी (२१ नोव्हेंबर) या कंपन्यांचे परीक्षा शुल्काचे दर सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले. टीसीएसला प्रत्येक विद्यार्थ्यास ६७५ रुपये, तर आयबीपीएसला प्रतिविद्यार्थी ४७५ रुपये ऑनलाइन परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५० ते २५ टक्के परीक्षा शुल्कात सवलत देण्यात येत असते. मात्र या दोन कंपन्या केवळ १० टक्के सवलत देणार आहेत. राज्यात सरळ सेवेची ७५ हजार पदे भरायची आहेत. ही पदे पूर्वी दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत भरली जात असत. वर्ग ब, क आणि ड वर्गातील ही पदे राज्य लोकसेवा आयोग भरत नाही. मात्र मध्यंतरी ही पदे त्या त्या विभागाच्या वतीने कोणत्या तरी कंपन्यांना भरण्याची कंत्राटे दिली गेली. परीक्षा पेपर फुटल्याने सरकारची मोठी नाचक्की झाली. त्यामुळे नामांकित कंपन्यांना हे काम देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे.

ज्या विभागाला पदे भरायची आहेत त्या विभागाने टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आणि आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅड पर्सोनेल सिलेक्शन) या दोन कंपन्यांपैकी एकीची निवड करावी. तसेच जे दर निश्चित केले आहेत त्यामध्ये १५ टक्केपर्यंत वाढ करण्याचा अधिकार संबंधित विभागाला असणार आहे. सदर शुल्कनिश्चिती ही पुढची तीन वर्षे राहणार आहे.

परीक्षा केंद्रावरील जॅमर, मेटल डिटेक्टर, सीसीटीव्हीच्या ३०० रुपयांचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाच लावला भुर्दंड अशी हाेणार कंपन्यांची कमाई : पुढच्या दोन वर्षांत तब्बल ७५ हजार जागा राज्य सरकार भरणार आहे. प्रति विद्यार्थी ६५० रुपये शुल्क जरी पकडले तरी चार कोटी ८७ लाख रुपयांपर्यंतचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना मोजावे लागणार आहे.

टीसीएसचे दर : प्रति विद्यार्थी ४९५ ते ६७५ रुपये असे दर निश्चित केले आहेत. विद्यार्थी संख्या अधिक असल्यास दर किमान तर कमी असल्यास कमाल परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.

आयबीपीएसचे दर : या कंपनीचे दर प्रति विद्यार्थी ४७५ रुपये असणार आहेत. मात्र ही कंपनी छायाचित्र पडताळणीचे २५ रुपये, बयोमेट्रिक ३२ रुपये, मेटल डिटेक्टर ३२ रुपये, सीसीटीव्ही ४० रुपये, मोबाइल जॅमर ४६ रुपये, स्कॅनिंग ५० रुपये आणि सोशल डिस्टन्सिंग ४० रुपये असे प्रति विद्यार्थी ३०० रुपये आकारणार आहे.

बातम्या आणखी आहेत...