आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची माहिती:जिल्हा परिषदेतील 13,500 पदांसाठी लवकरच ऑनलाइन परीक्षा

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदांमधील गट क आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या १३,५२१ रिक्त पदांसाठी मार्च २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी आयबीपीएस कंपनीसोबत सामंजस्य करार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन पोर्टल विकसित करून लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच विधानसभेत दिली.

आमदार संजय सावकारे, लहू कानडे, दत्तात्रय भरणे यांनी याबाबतच्या तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यावर महाजन म्हणाले, जिल्हा परिषदेच्या विविध १३,५२१ पदांच्या भरतीसाठी १२.७२ लाख उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले. त्यांच्याकडून परीक्षा शुल्कापोटी घेतलेले २५ कोटी रुपये शासनाकडे जमा आहेत. २१ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

एका परीक्षेसाठी वयोमर्यादेत सूट मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत व सध्या वयोमर्यादेमुळे ते परीक्षेस बसण्यास अपात्र ठरू नये याकरिता फक्त एका परीक्षेला बसण्यासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...