आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्यातील उद्योगांमध्ये मराठी मुलांना नोकरी मिळावी, हा या पोर्टलचा उद्देश असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या 'महाजॉब्स पोर्टल'चे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. उद्योजक आणि अकुशल, अर्ध-कुशल, कुशल मनुष्यबळ यामधील दरी कमी करण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल आहे. राज्यातील उद्योगांमध्ये मराठी मुलांना नोकरी मिळावी, हा या पोर्टलचा उद्देश असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. 

कंपन्यांना कशा प्रकारचे कामगार हवेत याची माहिती कंपनी कामगार विभागाला कळवणार आहे. त्यानुसार महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांना नोकरी मिळू शकेल. मिशन बिगिन अगेनमध्ये सुरू झालेल्या 64 हजार उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी देण्यासाठीचे ऐतिहासिक पाऊल म्हणजे महाजॉब्स पोर्टल आहे असे उद्योगमंत्री सुक्षाष देसाई म्हणाले. 

टाळेबंदीनंतर राज्यात सध्या 65 हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा  स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे  उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. याकामी उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे अथक प्रयत्न व मार्गदर्शनाखाली  अत्यल्प वेळेत हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला आहे.

0