आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या विधवांच्या पुनर्वसनाचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे मांडण्यात आला. या मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर देताना जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात २१३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मान्य केले. विशेष म्हणजे, दैनिक दिव्य मराठीने २० डिसेंबर २०२२ च्या अंकात शेतकरी आत्महत्यांचे भीषण वास्तव मांडले होते. गेल्या ९ महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात ७५७, अमरावती ९१७ आणि नागपूरमध्ये २६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. २१३८ आत्महत्या प्रकरणांपैकी जिल्हास्तरीय समितीने ११५९ प्रकरणेच मदतीसाठी पात्र ठरवली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.