आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवारपर्यंत कामावर परतल्यास कारवाई मागे घेण्यात येईल, असे अभय राज्य सरकारने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र गेल्या तीन दिवसांत संपात सहभागी झालेले अवघे ३३९ कर्मचारी कामावर परतले असून २० जानेवारी रोजी विलीनीकरणाचा अहवाल येईपर्यंत एसटी संप सुरूच राहणार हे सोमवारी (ता.१३) स्पष्ट झाले आहे. राज्यात ३ नोव्हेंबरपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचारी कामावर परतले तर त्यांच्यावर सेवा समाप्ती व निलंबनाची केलेली कारवाई मागे घेण्यात येईल, असे आश्वासन दिले हाेते. तसेच कामावर परत येण्याचा सोमवार (दि.१३) हा शेवटचा दिवस दिला होता. यासंदर्भात एसटी महामंडळाकडे विचारणा केली असता, राज्य परिवहन महामंडळात आज एकूण २१ हजार ३७० कर्मचारी कामावर हजर होते.
20 जानेवारीनंतरच संप मिटण्याची चिन्हे
१. मुंबई उच्च न्यायालयात एसटी संपाबाबतची २० डिसेंबर रोजी सुनावणी आहे. त्याकडे कर्मचारी व सरकारचे लक्ष लागले आहे. सरकारकडचे सर्व पर्याय संपले आहेत. यापूर्वी सरकारने मेस्मा लावण्याचा इशारा देऊन पाहिला. मात्र संपकरी कर्मचारी बधले नाहीत.
२. राज्य सरकारात विलीनीकरण ही एसटी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. त्याबाबत एक समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल २० जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल, अशी चिन्हे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.