आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने सोमवारी नवे निर्बंध लागू केले. यानुसार हॉटेल्स, रेस्टाॅरंट, कार्यालये, चित्रपटगृहांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली असून कार्यालयांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे नवे निर्बंध ३१ मार्च पर्यंत राहतील.
लग्न सोहळ्याला ५० जणांनाच परवानगी असेल. मर्यादेचे उल्लंघन केल्यास कार्यालयांच्या मालकांवर कारवाई हाेईल. तसेच अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी असेल. दरम्यान, आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय, निमसरकारी, खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारीच उपस्थित असावेत, असे निर्देश अाहेत. कार्यालये, आस्थापनांमध्ये मास्क व तापमान तपासूनच प्रवेश मिळेल. शॉपिंग मॉल्समध्येही हे नियम लागू राहतील.
लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध : आराेग्यमंत्री टोपे
वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचे अारोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. लग्न सोहळे, सामाजिक कार्यक्रमांच्या ठिकाणी तसेच शहरात गर्दी टाळावी, असे अावाहन त्यांनी केले. राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही. संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ‘ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट’ या त्रिसूत्रीनुसार काम केले जात अाहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.