आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईतील वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी ऑपरेशन ऑलआऊटचा एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी मोठ्या संख्येने गुन्हेगारांना पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री 11 वाजता सुरू झाली आणि शनिवारी रात्री 2 वाजेपर्यंत चालली. अवघ्या 3 तासांत फौजदारी गुन्हे दाखले असलेल्या 362 आरोपींची चौकशी करण्यात आली.
22 तडीपार गुन्हेगारांना पकडले
याशिवाय या मोहिमेदरम्यान पोलिसांनी 22 तडीपार गुन्हेगारांना पकडले. तडीपार असूनही ते मुंबईत राहत होते. सोबतच फरार असलेल्या 48 आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. या कालावधीत एनडीपीएस कायद्यांतर्गत 53 प्रकरणे नोंदविण्यात आली. यापैकी 44 जण अमली पदार्थांचे सेवन करणारे होते. आरोपींकडून एमडी आणि गांजा देखील जप्त करण्यात आला. ऑपरेशन ऑलआउट दरम्यान पोलिसांनी शहरातील 851 हॉटेल्स, लॉजची झाडाझडती घेतली आणि 851 ठिकाणच्या नाकाबंदी दरम्यान 7562 वाहनांची तपासणी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.