आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ऑपरेशन लोटस' हा 'अल-कायदा'सारखा दहशतीचा शब्द:शिवसेनेची भाजपवर तोफ; मेंढरे घाबरून पळाल्याचा शिंदेंना टोला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. आजच्या अग्रलेखात केंद्र सरकारला 2024 चे भय वाटते आहे. हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे आहे. इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच, त्यांचे बहुमत निखळ नाही, ते चोरलेले आहे. असे म्हणताना ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द आहे, असे आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

‘कमळ’ बदनाम झाले
देशाची परिस्थिती संभ्रमित झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अशा अनेक संभ्रमित गोष्टींचे सध्या पेव फुटले आहे. सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे असे जे सुरू आहे त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला. ‘दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन कमळ ‘फेल’ गेले आहे. भाजप उघडा पडला आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

येथे नाही चालले ऑपरेशन कमळ

बिहारमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ चालले नाही व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी अमित शहा यांना खुले आव्हान दिले की, ‘‘ईडी, सीबीआय वगैरे लावून माझे सरकार पाडून दाखवा.’’ महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत. सगळ्यांत महत्त्वाची घडामोड दिल्ली राज्यात घडली. ईडी, सीबीआयचा वापर करून केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्ली सरकारचे मद्य धोरण, त्यांची अबकारी नीती, त्यांनी मद्यविव्रेत्यांना दिलेले ठेके हा भाजपच्या दृष्टीने टीकेचा विषय असेल, पण तो निर्णय व्यक्तिगत नव्हता, तर संपूर्ण सरकारचा होता व त्यात दिल्लीच्या नायब राज्यपालांचाही समावेश असतो, पण ‘कॅबिनेट’च्या निर्णयाचे खापर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांवर फोडून त्यांच्यावर सीबीआयने धाडी टाकल्या. त्यांना या प्रकरणात पहिल्या क्रमांकाचे आरोपी केले व हे प्रकरण आता ईडीकडे, म्हणजे भाजपच्या विशेष शाखेकडे सुपूर्द केले. मनीष सिसोदियांवर अटकेची टांगती तलवार आहे. सिसोदिया हे काही पळून जाणारे गृहस्थ नाहीत, पण एखाद्या गुन्हेगारांप्रमाणे त्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी करून लोकनियुक्त सरकारची मानहानी केली गेली. म्हणूनच देशाची स्थिती संभ्रमित आहे, असे श्री. पवार म्हणतात ते खरे आहे. हे सर्व केजरीवाल यांचे सरकार पाडण्यासाठी सुरू आहे. आता श्री. मनीष सिसोदिया यांनी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’वर बॉम्ब टाकला आहे. ‘‘भाजपमध्ये प्रवेश करा,

महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली

‘ऑपरेशन कमळ’ हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी किती घातक आहे हे किळसवाण्या पद्धतीने समोर आले. महाराष्ट्रात याच पद्धतीने ऑपरेशन केले गेले, पण मोठे राज्य असल्याने व शिवसेना पह्डणे हाच मुख्य अजेंडा असल्याने ईडीचा धाक अधिक पन्नास ‘खोके’ अशी बेगमी केली असे सर्रास बोलले जाते. महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली तसे दिल्लीचे आमदार व त्यांचे नेते पळाले नाहीत. ते भाजप व ईडीविरोधात ठामपणे उभे राहिले. महाराष्ट्रात शिवसेना नेते संजय राऊत हे बेडरपणे ईडीला सामोरे गेले.

'यांना' सावलीचेही भय वाटते
बिहारात सत्तापरिवर्तन होताच राष्ट्रीय जनता दलावर सीबीआय, ईडीच्या धाडी पडाव्यात हा निव्वळ योगायोग कसा म्हणावा? पण तेजस्वी यादव यांनी थेट सांगितले ‘‘महाराष्ट्रात जे घडले ते बिहारात होणार नाही. बिहार घाबरणार नाही. जे डरपोक आहेत त्यांना ईडी-सीबीआयची भीती दाखवा.’’ मुळात केंद्र सरकार व त्यांच्या यांना 2024 चे भय वाटते आहे. हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे आहे. यांना आपल्या सावलीचेही भय वाटते. म्हणून ते नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान यांच्याही मागे लागले, असे दिसते. इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच. त्यांचे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. म्हणून स्वातंत्र्य व लोकशाही संकटात आहे. अशा स्थितीत जे शरण जातील तेच खरे देशाचे शत्रू! धाडसत्र व सूडाची छापेमारी ही त्यांची शस्त्रे. त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ’ होते, पण कमळाच्या लाभार्थींवर सरकारी छाप्यांचे वार होत नाहीत. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. पण या न्यायनिवाडय़ास विलंब होऊ नये, एवढीच जनतेची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...