आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांची टीका:आमची सत्ता असताना फडणवीसांनी हायकोर्टात आरक्षण टिकवले, ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टात अपयश; सर्वपक्षीय बैठक बोलवावी -भाजप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवून ठेवण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात सकाळी साडे दहा वाजता सुनावणी सुरू झाली. 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आशिष शेलारांनी यावर बोलताना म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीसांनी मिळवून दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश आले आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवून ठेवण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश

शेलार म्हणाले की, मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास गटात घेऊन नोकरी आणि शिक्षणामध्ये जे आरक्षण देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मिळवून दिले होते. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवून ठेवण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश आले आहे.

हे राज्य सरकारचे अपयश - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांनी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचा मी निषेध करतो. मराठा आरक्षणाचे काय करावे यासाठी राज्य सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे आहे. मराठा आरक्षण आजचा निकाल म्हणजे राज्य सरकार च अपयश आहे.

मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस - प्रविण दरेकर
याविषयी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, आजचा दिवस हा मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस आहे. या निर्णयावरुन सरकारचा निष्काळजीपणा स्पष्ट झाला आहे. असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. कोर्टाचा निकाल राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे आला आहे. आता या प्रकरणी अशोक चव्हाणांनी प्रायश्चित घ्यावे आणि ठाकरे सरकारला समोरे जावे.

बातम्या आणखी आहेत...