आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत विशेष प्रशिक्षण:बार्टीमार्फत यूपीएससी पूर्वतयारीसाठी आता 300 विद्यार्थ्यांना संधी

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक २०० विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही संख्या आता शंभरने वाढवून ३०० करण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

दरवर्षी बार्टीमार्फत विशेष चाचणी परिक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. दिल्ली येथे नामांकित प्रशिक्षण केंद्रात प्रवेश, उमेदवारांना निवास व भोजन व्यवस्था देखील बार्टी मार्फत पुरवली जाते. मागील दोन वर्षात लॉकडाऊन काळात देखील उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील अनेक विद्यार्थ्यांची चांगले यश संपादन केले. बार्टीचे २०२० साली ९, २०२१ साली ७ उमेदवार यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी बनले आहेत. याचाच विचार करून आता प्रशिक्षणार्थींची संख्या शंभरने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुंडे यांनी सांगितले. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...