आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास खोके एकदम ओक्के!:विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांची घोषणाबाजी; मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पाहिजे का?

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. याच पायऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सत्ताधारी आमदार जात होते. त्याचवेळी पन्नास खोके, पन्नास खोके, अशा घोषणा विरोधक देत होते. हे ऐकताच शिंदे गटाचे आमदार हसत होते. विरोधक पन्नास खोके म्हणताच मंत्री शंभूराज देसाई पाहिजे का, पाहिजे का असे विरोधकांना म्हणत होते. यावेळी सत्ताधारी, विरोधकांत चांगलाच कलगीतुरा रंगला.

पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत शिंदे गटाला सत्ता आली म्हणून मस्ती आली का? असा सवाल केला होता. त्यानंतर सायंकाळी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावरही विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर आज अधिवेशनाला सुरवात झाली खरी परंतु, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत विधानसभेच्या पायऱ्यावर ठिय्या मांडला.

गद्दार आले रे आले...

शिंदे सरकारविरोधात आज विधानसभेच्या पायऱ्यावर विरोधक जोरदार घोषणाबाजी करीत होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संदिपान भुमरे, शंभूराज देसाई यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर आमदार जात होते. त्यावेळी विरोधकांनी मोका साधून, आले रे आले गद्दार आले, आले रे आले पन्नास खोके आले अशा घोषणा दिल्या. त्यावर तुम्हाला हवे का...पाहिजे का असे शंभूराज देसाई म्हणाले.

शिंदे सरकारविरोधात या घोषणा

  • ईडी सरकार हाय हाय..
  • शिंदे-फडणवीस सरकारचा धिक्कार असो...
  • या इडी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय
  • आले रे आले गद्दार आले..

का दिल्या घोषणा?

शिंदे गटाने शिवसेनेविरोधात दगाबाजी केल्याचा आरोप केला जात आहे. सत्तेतून बाहेर पडत एक एक आमदार एकनाथ शिंदे यांना जावून मिळाला. यामुळे आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेशी दगाफटका करणाऱ्या आमदारांना गद्दार म्हणून संबोधले होते. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी टीका केली होती. शिंदे गटात जाण्यासाठी एका आमदाराला पन्नास कोटी रुपये दिले जात होते असाही आरोप केला आहे. त्यामुळेच गद्दार आणि पन्नास खोके, अशी घोषणाबाजी केली जात होती.

बातम्या आणखी आहेत...