आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी:‘पन्नास खोके, सरकार ओके..’ मुख्यमंत्र्यांसमोर विरोधकांचे नारे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (ता.१७) विरोधकांनी राज्य सरकारविरोधात विधानभवनाच्या प्रवेशद्वारी जोरदार घोषणाबाजी केली. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी विरोधकांची होती. ‘पन्नास खोके, सरकार ओके’, ‘स्थगिती सरकार हाय हाय’, ‘महाराष्ट्राशी गद्दारी सत्तेत आली शिंदेंची स्वारी’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सकाळी मुंबईत सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार निदर्शने केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर करण्यात आलेल्या आंदोलनात विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीचे आमदार सहभागी झाले होते.

सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री विधिमंडळात प्रवेशकर्ते होताच विरोधकांनी आपल्या घोषणांचा जोर वाविला. सरकारच्या विरोधात विरोधकांची घोषणाबाजी सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळ आवारात पोहोचले. त्यांना पाहून विरोधकांनी घोषणाबाजी आणखी तीव्र केली. त्यामुळे सत्ताधारी आणि विराेधी आमदार या वेळी आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

‘हे सरकार जनतेशी बेइमानी करून सत्तेत आले आहे, गद्दार सरकार राज्य चालवू शकत नाही, ते लवकरच कोसळणार आहे,’ असा दावा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना केला. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे घोषणा देण्यात अग्रभागी होते.

बातम्या आणखी आहेत...