आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरच हल्ला; ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणा,:विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे राज्य सरकारला आवाहन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारने खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी असे आवाहन अजित पवार यांनी सरकारला केले. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीने सीमाभागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे आहेत. सत्तारुढ पक्षांनीही आपले कर्तव्य पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि हल्ले खपवून घेवू नये, असेही ते म्हणाले.

आम्ही जशास तसे उत्तर देऊ ^छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडिगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. कोल्हापुरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत. वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल.- संभाजीराजे छत्रपती

काँग्रेसच्या फायद्यासाठी आंदोलन ^ हल्ला करणाऱ्या कन्नड वेदिका संघटनेला काँग्रेस आणि जेडीएस या दोन पक्षांची फूस आहे. पुढच्या काळात काँग्रेसला फायदा मिळावा यासाठी अशा पद्धतीने आंदोलने केली जात आहेत. एक वेगळे राजकारण सुरू आहे. - केशव उपाध्ये, प्रवक्ते भाजप

महाराष्ट्राचे मंत्री तंतरले ^ बोम्मई यांच्या दमदाटीला घाबरून महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारचे मंत्री तंतरले. महाराष्ट्र धर्माशी केलेली गद्दारी आहे. स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळाले. महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत? एवढे हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं! - आदित्य ठाकरे

बातम्या आणखी आहेत...