आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानपरिषदेत गदारोळ:'...तर आम्ही घरी जातो' म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संताप, सभागृहातील गोंधळानंतर तहकूब करण्यात आले होते कामकाज

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा होत नसेल, पूरग्रस्तांविषयी चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे बसायचच कशाला? फडणवीस

वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर त्यांच्याविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावरी हक्कभंग प्रस्ताव आणि त्यावरील चर्चेला आक्षेप घेतला होता. यानंतर भाजप आमदारांनी गोंधळ घातल्यानंतर काही वेळासाठी सभागृगहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त केला.

अर्णब गोस्वामींच्या हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यानंतर कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं. यावर बोलताना विरोधीपक्ष नेते फडणवीस म्हणाले की, 'चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा होत नसेल, पूरग्रस्तांविषयी चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे बसायचच कशाला' असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग प्रस्ताव आणि त्यावर होत असलेल्या चर्चेला आक्षेप घेतला होता. यावर बोलताना ते म्हणाले होते की, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आम्हाला सभागृहात बोलावलं. तसेच 3 वाजता चर्चा करू असे आश्वासन दिले. मात्र शिवसेनेचे आमदार एकामागून एक विषय काढत आहेत. मग आता 5 वाजताच चर्चा करा ना. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांवर बोलले जात नसले. असे महत्त्वाचे विषय असताना असं कसं चालेल? आत्ता आपण ही चर्चा सुरु केली आहे तर 3 वाजता मंत्र्यांच्या उत्तरासह ही चर्चा संपवावी लागेल. चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. असं फडणवीस म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...