आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात परिवर्तनाची नांदी म्हणजे भाजपचा विजय असून महाविकास आघाडीतील असंतोष हे त्यांच्या पराभवाचे कारण आहे. राज्यात लोकाभिमुख सरकार आणेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या विजयानंतर सांगितले.
फडणवीस म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते घेतली होती. आता विधान परिषद निवडणुकीत १३४ मते घेतली. महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हते. पण काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मते घेतली. आमच्या उमेदवारांनी प्रचंड मते घेत विजय मिळवला. पुन्हा एकदा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना या विजयात महत्त्व देत असल्याचे ते म्हणाले. सर्व पक्षांतील आमदार आणि अपक्षांचे आभारही त्यांनी या वेळी मानले. आमचा संघर्ष जनतेसाठी आहे, सत्तेसाठी नाही.ही परिवर्तनाची सुरुवात आहे. महाविकास आघाडीविरोधात जनतेत खदखद असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, निकाल लागण्याआधीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई सोडून नागपूरकडे प्रयाण केले. विमानतळावर त्यांनी भाजपचे गर्वहरण होईल, असे सांगितले. मात्र, सायंकाळी हंडोरे यांचा पराभव झाला. हंडोरे यांचा पराभव हा आपल्यासाठी धक्कादायक असल्याचे विजयी उमेदवार भाई जगताप यांनी सांगितले.
काँग्रेसच्या गटबाजी फटका बसला : संजय निरुपम
काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सांगितले की, हा काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फटका हंडोरे यांना बसला आहे. त्यांना पहिल्या पंसतीच्या मते मिळायला हवी. नेत्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.