आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:सरकारला शेतकऱ्यांची नव्हे, तर मद्यपींची चिंता, विरोधी पक्षनेते फडणवीस यांची गडचिरोलीत टीका

गडचिरोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने मुंबईतील बिल्डरांना कराबाबत सवलत दिली, बारमालकांचा टॅक्स ५० टक्के कमी केला; पण सरकारला शेतकऱ्यांचे वीज बिल कमी करावे वाटले नाही. विदेशी दारूवरचा कर अर्धा केला. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांची नव्हे, तर मद्यपींची चिंता असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. ते महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सोमवारी गडचिरोली भाजपच्या वतीने आयोजित महा जनआक्रोश मेळाव्यात बोलत होते.

या वेळी माजी अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोक नेते, आ. देवराव होळी, कृष्णा गजभे, कीर्तिकुमार भांगडिया, गडचिरोलीचे माजी पालकमंत्री अंबरीशराव आत्राम, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, माजी आमदार अतुल देशकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, केंद्र सरकार मात्र सातत्याने सामान्य माणसाचा अधिकाधिक विचार करत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसींचे आरक्षण संपवण्याचे षड््यंत्र होत आहे. माजी ऊर्जामंत्री आमदार बावनकुळे यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकार बदल्याच्या भावनेतून काम करत असल्याचा आरोप केला. सूत्रसंचालन रवींद्र ओल्लालवार, तर आभार प्रदर्शन प्रशांत वाघरेंनी केले.

बातम्या आणखी आहेत...