आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीकास्त्र:विरोधी नेते ‘हेल्थ, डिझास्टर टुरिझम’साठी फिरताहेत, मंत्री आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विरोधी पक्षाने टीका करताना विचार करून करावी : आदित्य ठाकरे

सध्या आमचा भर नागरिकांना फिट ठेवण्यावर आहे. विरोधी पक्ष मात्र इथल्या ‘हेल्थ आणि डिझास्टर टुरिझजम’मध्ये व्यस्त असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील एमएमआर रिजनमधील सर्व आयुक्तांची बैठक शनिवारी कल्याणमध्ये पार पडली. त्यानंतर ते बोलत होते.

एमएमआर रिजनमधील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक आदित्य ठाकरे यांनी शनिवारी घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशाप्रकारे काम सुरू आहे याचा ऊहापोह आम्ही या बैठकीत केला. लोकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून तदुरुस्त कसे ठेवता येईल याचे मुख्य आवाहन आहे. एमएमआर विभागामध्ये वाढणाऱ्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय प्रतिसाद आणि मेडिकल इमर्जन्सी हे दोन महत्त्वाचे घटक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील तोकड्या आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवत टीका केली होती. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टुरिझम करत आहे. तर, आम्ही मात्र, लोकांची मदत कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले आहे. राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

फडणवीसांचा राज्यभर दौैरा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभर दौरे करून आरोग्य यंत्रणातील त्रुटीवर बोट ठेवत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विराेधी पक्षात यामुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

तुम्ही लाेकांची कामे करा

आम्ही जशी लोकांची काम करत आहोत, त्याप्रमाणे तुम्हीही करा. कोरोना हे जगातील सर्वात मोठी महामारी असून एका शहरापुरताच मर्यादित नाही आहे. विरोधी पक्षाने टीका करताना विचार करून करावी. इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा, आम्ही कोणावरही दोष न देता काम करत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले. एमएमआर रिजनमध्ये धारावी पॅटर्न राबवणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.  

0