आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दर घटले:इंधनावरील व्हॅट कपातीकडे राज्याचे लक्ष, भाजपच्या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे निर्णय घेतल्याचा विरोधकांचा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने प्रतिलिटर पेट्रोलमागे ५ रुपये तर प्रतिलिटर डिझेलमागे १० रुपये अबकारी करामध्ये घट केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती उतरल्या आहेत. राज्यानेही आपल्या व्हॅट करात कपात करावी, असेही आवाहन केंद्राकडून करण्यात आले असून त्याला भाजपशासित नऊ राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता महाराष्ट्र राज्य सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, बिहार या भाजपशासित राज्यांनी त्यांच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात पेट्रोल मिळणार आहे.

व्हॅट कपात करण्याचा निर्णय घेतलेल्या नऊ राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, गुजरात आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे.

भाजपच्या पराभवानंतर दर घटले
१. पेट्रोलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा लागेल, परंतु केंद्र सरकारने इंधनाचे दर किमान २५ रुपये कमी करावयास पाहिजे होते, असे संजय राऊत म्हणाले.

२.’तुम्ही भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील. सततची ही लूट थांबवायची असेल तर भाजपला पूर्ण पराभूत करा,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...