आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविरोधी पक्षाने राज्यसभा निवडणूक आमच्यावर थोपवली, याचा पश्चाताप त्यांना होईल. आमचे सर्व उमेदवार सहज जिंकून येतील. भाजपने घोडेबाजार मांडला असून त्यांचेच घोडे अन् त्यांचाच बाजार आहे, आम्हाला बाजारात उभे राहण्याची गरज नाही अशी टीका शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली.
आम्हालाही ताकद दाखवण्याची संधी
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज झाली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले, काही लोक पैशांचा वापर करीत आहे त्यांना ते करुद्या. विजय मात्र आमचाच आहे. भाजपने तिसरा उमेदवार उभा केल्याने आम्हालाही बळ दाखवण्याची संधी मिळणार आहे.
अतिशहाणपणा करू नये
आमच्या उमेदवाराची आणि विजयाचीही कुणीही चिंता करु नये आणि अतिशहाणपणाही करु नये आमचे उमेदवार संजय पवार निवडून येतीलच. आजच्या आमच्या बैठकीत महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि मुख्यमंत्रीही उपस्थित होते असेही राऊत यांनी सांगितले.
सीएमसोबत मविआच्या नेत्यांची झाली बैठकआम्ही निवडणूक स्वीकारली आहे. पण महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतीलअजिबात घोडेबाजार होणार नाही असेही ते म्हणाले.
काय म्हणाले राऊत?
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत मविआ प्रमुख नेत्यामची बैठक झाली असून आम्ही निवडणूक स्वीकारली आहे. आम्हाला बळ दाखवायचे नव्हते पण भाजपने विरोधात उमेदवार उभा करून आमचे बळ दाखवण्याची आम्हालाच पून्हा एकदा संधी दिली आहे. हि निवडणूक विरोधकांनी आमच्यावर लादली असून त्यांना पश्चातापच होणार आहे.
फडणवीसांची प्रतिक्रीया
आमच्याकडे जास्त मते आहेत, शिवसेनेकडे कमी मते आहेत. आमच्याकडे तिसऱ्या जागेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याने आम्ही उमेदवार उभा केला आहे. उलट शिवसेनेचे उमेदवार मागे घ्यायला हवा होता असेही फडणवीस म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.