आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारींबाबत जनतेत वाढता असंतोष असून आता राज्य सरकारमधूनही नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर शनविारी म्हणाले, ‘राज्यपालांनी माफी मागायला हवी होती. त्यानी माफी मागितली असती तर हे प्रकरण इतके वाढले नसते. यापूर्वीही असेच विधान राज्यपालांनी केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते.’ दुसरीकडे, कोश्यारी यांनी छत्रपती शविाजी महाराजांच्या विषयी केलेल्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अॅड.आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, “हा संपूर्ण प्रसंग छत्रपती शविाजी महाराजांशी संबंधित आहे. छत्रपती शविाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करू शकत नाही.”
पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी निर्णय शक्य कोश्यारींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च नेतृत्वासमोर भूमिका मांडली आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला महाराष्ट्रात येणार आहेत. गुजरात नविडणूकही ५ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी कोश्यारींबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतींनी उदयनराजेंचे पत्र गृह खात्याला पाठवले कोश्यारींच्या वक्तव्यावर छत्रपती शविाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले प्रचंड संतापले आहेत. त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून राज्यपालांची तक्रार केली आहे. राष्ट्रपतींनी त्यांचे पत्र चौकशीसाठी गृह मंत्रालयाला पाठवले आहे. खुद्द खासदार उदयनराजे यांनीच अशी माहिती पत्रकारांना दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.