आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मराठा आरक्षणाविरोधात विरोधकांचे राजकीय षड‌्यंत्र, मंत्री उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मराठा आरक्षणाविरोधात विरोधकांचे राजकीय षड‌्यंत्र'

मराठा आरक्षण कायम राहू नये, यासाठी मोठे राजकीय षड‌्यंत्र सुरू आहे. राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत. यावरून झालेल्या आंदोलनांचा बोलविता धनी वेगळा असून, ही आंदोलने भाजपपुरस्कृत आहेत, असा थेट आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी केला.

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन भक्कम तयारी केली आहे. मुंबई हायकोर्टात राज्य सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनाच सुप्रीम कोर्टात कायम ठेवले आहे. हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, रफिक दादा, विजयसिंह थोरात अशी दिग्गज मंडळी मराठा आरक्षणाची बाजू लावून धरणार आहेत.

स्थगिती मिळावी म्हणून आरक्षणाच्या विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात आजवर अनेक प्रयत्न केले. परंतु, दरवेळी सरकारने भक्कमपणे बाजू मांडली व मराठा आरक्षणाला धक्का लागू दिला नाही, असा दावा चव्हाण यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...