आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची भूमिका:'मातोश्री'वरुन सर्व प्रवक्त्यांना आदेश, कंगनाविरोधात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, कायदेशीर कारवाई हीच शिवसेनेची व्यूहरचना

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाच्या ट्विटवर, विधानांवर प्रतिक्रिया न देण्याचे आदेशही प्रवक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहेत.

कंगना रनोटच्या मुंबईविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आत मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिलमधी कार्यालयावर हतोडा चालवला. न्यायालयाच्या आदेशानंतर तुर्तास ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान कंगना थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. यापूर्वीच 'मातोश्री' वरुन प्रवक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना फर्मान आले आहे.

कंगना आणि तिच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईविषयी कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका असे आदेश शिवसेनेच्या नेतृत्त्वाकडून देण्यात आले आहेत. 'कंगनाला जास्त महत्त्व देण्यात येऊ नये. तिच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. कंगनाच्या ट्विटवर, विधानांवर प्रतिक्रिया न देण्याचे आदेशही प्रवक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहेत. थेट मातोश्रीवरुन या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कायदेशीर कारवाई हीच शिवसेनेची व्यूहरचना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...