आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याच्या आशा पल्लवित:औरंगाबादसह 24 महापालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागांची रचना करण्याची सूचना
  • नगरविकास विभागाचे पत्र

औरंगाबादसह राज्यातील २४ मनपा निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी (२२ नोव्हेंबर) काढले आहेत. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या मनपाच्या निवडणुकीसाठी सन २०११च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे स्थगिती दिलेल्या निवडणुका होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यावर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच निवडणुकांबाबत निर्णय होईल.

शिंदे सरकारच्या निर्णयानुसार ४ सदस्यीय प्रभागाचीच शक्यता जास्त सदस्य नेमके किती स्पष्ट नाही १. ठाकरे सरकारने एका प्रभागात ३ सदस्य असतील अशी रचना केली होती. तर शिंदे- फडणवीस सरकारने ४ सदस्यांचा निर्णय घेतला आहे. २. नगरविकास विभागाने मंगळवारी काढलेल्या पत्रामध्ये प्रभागात किती सदस्य असतील याबाबत स्पष्टता नाही. मात्र शिंदे सरकारच्या निर्णयानुसार एका प्रभागात ४ सदस्य अशीच रचना होण्याची शक्यता. ३. प्रभागांची संख्या, त्यांची रचना आरक्षण सोडत पुन्हा करावी लागेल. त्याला महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या मनपात प्रभागरचना मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर या मनपांची मुदत संपली. इचलकरंजीची पहिल्यांदा निवडणूक होणार आहे.

कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू नका कोर्टाच्या निर्णयाची वाट न पाहता आपल्या अधिकारात मनपा प्रशासनाला प्रभाग, वॉर्डांची संख्या निश्चित करून प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. २०११ च्या जनगणनेनुसारच २०१७ मध्ये झालेल्या क महापालिका निवडणुकीत जी प्रभाग/वॉर्ड संख्या होती तेवढीच संख्या निश्चित करण्यात येणार आहे.

मुंबईसह बहुतेक सर्व मनपांत झाली होती ९ नगरसेवकांची वाढ आघाडी सरकारने लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग/ वॉर्ड संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईसह राज्यातील बहुतेक सर्व महापालिकांत ९ नगरसेवकांची वाढ झाली होती. मात्र, ठाकरे सरकारचा निर्णय बंडखोर-भाजप सरकारने बदलला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर २८ नोव्हेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.

तीन मनपा सोडून उर्वरित प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच : पुणे, कल्याण-डोंबिवली, वसई - विरार या तीन महापालिका हद्दीत गावे वगळली किंवा समाविष्ट करण्यात आली आहेत. उर्वरित महापालिकांची प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच म्हणजे एका प्रभागात चार सदस्य अशी होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...