आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रक्तदान व अवयवदान शिबिराचे आयोजन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने(५ जून) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रक्तदान व अवयवदान शिबिराचे आयोजन मुंबई येथील मुख्यालयात केले होते. गेल्या दोन वर्षातील कोविड साथीमुळे अनेक रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा भासत आहे. यावर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचे भान जपत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी फोर्टिज रुग्णालय मुलुंड यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, तर फेडरेशन ऑफ ऑरगन अँड बॉडी डोनेशन या संस्थेच्या सहकार्याने अवयवदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात एकूण ६३ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले, तर ११ कर्मचाऱ्यांनी अवयवदानासाठी नोंदणी केली. या शिबिराला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी प्रमोद नांदगावकर, क्षेत्र अधिकारी सागर वरेकर, फोर्टिज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अलीषा केरकर व अन्य सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले होते. असा सामाजिक उपक्रम दरवर्षी घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड व सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...