आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्यशाळा:पोलिस अधिकाऱ्यांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉपचे आयोजन, शहरातील डॉक्टरांचा पुढाकार

नवी मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीमने सर्व नवी मुंबई पोलिस स्टेशनवर 9 प्रमुख सत्र आयोजित केले आहेत,

समाजाप्रती आपली बांधिकली दर्शवण्यासाठी, नवी मुंबईचे पोलिस कमिश्नर संजय कुमार आणि डीसीपी, हेडक्वार्टर, शिवराज पाटील यांच्या पुढाकाराने पोलिस अधिकाऱ्यांसाठी एक स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. या वर्कशॉपमध्ये ह्यूमन सायकोलॉजीमध्ये पीएचडी केलेल्या डॉ.साजिद सैय्यद, यांच्या नेतृत्वातील एका टास्क फोर्स टीमने मदत केली. यात सुप्रसिद्ध डॉ. इरफान भोम्बल, डॉ. माटे जेष्ठ मनोवैज्ञानिक, डॉ. राजाराम पवार आणि डॉ.नाहिद दवे यांनी सहभाग नोंदवला. या टीममध्ये शिरीन अग्रवाल आणि कल्पेश जैन यांनीदेखील मोलाची मदत केली.

टीमने सर्व नवी मुंबई पोलिस स्टेशनवर 9 प्रमुख सत्र आयोजित केले आहेत, ज्यात वाशीचे ट्रॅफिक पोलिस स्टेशनदेखील सामील आहे. या सत्रांच्या माध्यमातून 600 पेक्षा अधिक पोलिस अधिकाऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळवण्यास मदत मिळेल. नुकतच NRI सीवुड पोलिस स्टेशनमध्ये एक सत्र आयोजित केले होते, ज्यात डीसीपी शिवराज पाटिल आणि सीनियर PI शेखदेखील सामील झाले होते. याप्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांना संबोधित करताना डीसीपी पाटिल यांनी याप्रकारच्या कार्यशाळेचे आयोजनच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला आणि अधिकाऱ्यांना कोव्हिड संकटादरम्यान मानवतेखातर निस्वार्थ सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी फ्रंट लाइन टास्क फोर्सच्या योद्ध्यांचेदेखील यावेळी कौतुक केले. तसेच, सैय्यद म्हणाले की, “नवी मुंबई पोलिसांसोबतची ही भागीदारी आमच्या फ्रंट लाइन योद्ध्यांसोबत  सार्वजनिक सेवेच्या त्या प्रयत्नांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांचे समर्थन करने आणि एक शहर विकसित करण्यासाठी आमच्या समर्पणाला सुनिश्चित करण्याच्या संकल्पावर प्रकाश टाकते.“

त्यांनी यावेळी उल्लेख केला की, कशाप्रकारे अनेक तास ड्यूटी करने आणि आपल्या कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे या अधिकाऱ्यांना मानसिकदृष्ट्या त्रासदायक आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट सत्राच्या माध्यमातून त्यांना हे समजण्यास मदत मिळेल, की त्यांचे मानसिक आरोग्य का महत्वाचे आहे आणि कशाप्रकारे विभाग अशा कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत आहे. अधिकाऱ्यांची परिस्थिती सांगण्याऐवजी त्यांनी या गोष्टीवरही भर दिला, कशाप्रकारे सर्व फ्रंट लाइन योद्ध्यांचे कुटुंब एक मजबुतीने समोर येत आहे. यावेळी त्यांनी अनेकांना प्रोत्साहित करण्यासाठी आपली पत्नी तबस्सुम सैय्यद यांनाही धन्यवाद केले. डीजीपी टास्क फोर्स टीमचा या टप्प्यादरम्यान पूर्ण नवी मुंबईमध्ये सर्व ट्रॅफिक विभाग, पोलिस स्टेशन आणि प्रमुख चेक पॉइंटपर्यंत पोहचण्याचे लक्ष आहे डॉ.सैय्यद एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि द वॉइस- देशाचा आवाज नावाचे एका एनजीओदेखील चालवतात. या संकट समयी मुंबई आणि पुण्यातील अनेक कुटुंबांना राशन देऊन मदत केली आहे. ते राष्ट्रीय महिला आयोगसोबत मिळून , त्याच्या हेल्पिंग हँड्स कार्यक्रमात मदतदेखील करतात. यासोबतच महाराष्ट्राचे डीजीपी होमगार्ड, संजय पांडे यांच्यामार्फत तयार केलेल्या सिविल डिफेंस टीमसोबत मिळून गरजुंना जेवण पुरवतात.

बातम्या आणखी आहेत...