आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी:शिंदेंचे ओएसडी डॉ. गेठेंना नक्षलवाद्यांचे धमकीचे पत्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री शिंदे यांच्यापाठोपाठ त्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र सोमवारी (३१ ऑक्टोबर) मिळाले. या पत्रात गडचिरोलीमधील विकासकामांमध्ये लक्ष न देण्याचे सांगत त्यांना मारण्याची धमकी दिली.

डॉ. गेठे हे एकनाथ शिंदे यांच्याकडे ५ वर्षांपासून विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून कार्यरत आहेत. गडचिरोलीचे पालकमंत्री असताना शिंदेंनी नक्षलग्रस्त भागात विकासकामांची अंमलबजावणीची जबाबदारी गेठे यांच्यावर होती. त्या वेळी नक्षलवाद्यांनी गेठे यांना आपल्या कामात अडथळा निर्माण करत विकासकामे सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यावरही शिंदे यांनी गडचिरोलीत विकासकामे वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेठे यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी गेठे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याचे पत्र त्यांच्या घरी पाठवले.

बातम्या आणखी आहेत...