आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फैसूला पुन्हा अटक:मुंबईतल्या सोसायटीत घुसवली भरधाव BMW, सोशल मीडिया इंफ्लूएंसर फैसूला अटक; यापूर्वी वादात सापडला होता फैसू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावरील स्टार मिस्टर फैसू पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रात्री उशीरा मुंबईच्या ओशिवरा परिसरात वेगाने BMW कार चालवणाच्या प्रकरणात सोशल मीडिया इंफ्लूएंसर फैसूला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी फैसूवर आयपीसी कलम 279, 336अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फैसू त्याची बीएमडब्ल्यू कार सुसाट वेगाने चालवत होता. त्यानंतर कारचे नियंत्रण सुटले आणि कार एका सोसायटीचे गेट तोडून आत घुसली. या अपघातानंतर फैसू संधी पाहून तिथून पळून गेला. दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी स्वतःहून दखल घेत फैसूला अटक केली आहे. फैसूचे सोशल मीडियावर 24.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.

यापूर्वीही वादात सापडला आहे मिस्टर फैसू
सोशल मीडियावरील स्टार मिस्टर फैसू यापूर्वीही वादात सापडला आहे. टीकटॉकवर त्याचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स होते. दरम्यान एका व्हिडिओमुळे तो वादात सापडला होता. झारखंडमध्ये चोरीच्या आरोपात मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झालेल्या तरबेज अन्सारी प्रकरणात त्याने एक व्हिडिओ तयार केला होता.

या व्हिडिओमध्ये टीम 7 गँग नावाचे लोक म्हणत होते की, तरबेजची हत्या करण्यात आली आहे, मात्र जेव्हा तरबेजचा मुलगा मोठा होईल आणि आपल्या वडिलांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेईल तेव्हा त्याला दहशतवादी म्हटले जाऊ नये. या प्रकारचा व्हिडिओ बनवणे मिस्टर फैसूला महागात पडले होते. टिक टॉकने त्याचे अकाउंटचच सस्पेंड केले होते.

बातम्या आणखी आहेत...